मेजर रॉबर्ट गील यांना भुसावळात अभिवादन

भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । अजिंठा लेणी येथील भित्तिचित्राची पहिली प्रतिकृती साकारणारे महान चित्रकार मेजर रॉबर्ट गिल यांचा स्मृतिदिनानिमित्त अजिंठा या विषयावर चित्र आदरांजली अर्पण करण्यात आली.

दि.१० एप्रिल हा रॉबर्ट गील यांचा स्मृतिदिवस असतो. भुसावळ येथील ख्रीश्चन दफनभूमीत त्यांची समाधी आहे. तेथेच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सुरुवातीला आचार्य रेव्हरंट किशोर गायकवाड यांनी व सर्व उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण केली. नंतर जिल्हा व ईतर गावाहुन आलेले ज्येष्ठ चित्रकार राजेंद्र महाजन (प्राचार्य ललित कलामहाविद्यालय, चोपडा ),अतुल मालखेडे (प्राचार्य सप्त पुट ललित कला महा विद्यालय खिरोदा ), राजु बाविस्कर, शाम कुमावत, हरुन पटेल, निरंजन शेलार, शामकांत वर्डीकर, रमाकांत भालेराव, सुभाष पवार, अर्चना शेलार, वंदना पवार, श्रीकांत पवार , पार्थ चौधरी यांनी अजिंठा या विषयावरील चित्र साकारले. सन्मान समारंभात सुरुवातिला आर्टिस्ट व्हिजन फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंन्द्र जावळे यांनी संस्थेचे कार्य व भावी योजनांवर प्रकाश टाकृला व उपस्थितांचे स्वागत केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. राजेंन्द्र महाजन तर प्रमुख पाहुणे म्हणुन अतुल मालखेडे आणि राजु बाविस्कर हे होते. आपले मनोगत व्यक्त करतांना रमाकांत भालेराव यांनी या आयोजनाकरिता आयोजकांचे आभार मानले व असेच आणि याही पेक्षा मोठ्या स्वरुपात कार्यक्रमाचे आयोजनाबद्दल अपेक्षा व्यक्त केली. यानंतर सर्व सहभागी कलावंतांना झाडाचे रोप, स्मृतिचिन्हव प्रमाणपत्र देउन गौरवीण्यात आले. अध्यक्षीय भाषणात प्रा. राजेंन्द्र महाजन यांनी मेजर रॉबर्ट गील व अजिंठा चित्रशैली यावर सखोल माहिती विषद केली व आयोजकांचे कौतुक केले. पर्यावरण जागर प्रतिष्ठान व शैक्षीक आगाज चे  नाना पाटील सुरेंन्द्रसिंग पाटील यांनी झाडांची रोपे उपलब्ध करुन उपस्थितांना वितरित केली.

सुत्रसंचालन राजेश्री देशमुख यांनी अनोख्या पद्धतीने करुन उपस्थित कलावंतांची दाद मिळवली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सेंट पॉल चर्चचे सदस्य, काशिनाथ कनोजे, मोहित पाटील, संतोष उपाध्याय, किशोर पाटील, जयश्री चौधरी यांनी परिश्रम घेतले. या वेळी अनेक चित्राकार व रसिक नागरिक उपस्थित होते.

Protected Content