शिवपुर कन्हाळा येथून विवाहिता बेपत्ता

WhatsApp Image 2019 08 02 at 5.38.09 PM

भुसावळ, प्रतिनिधी | तालुक्यातील शिरपुर-कन्हाळा येथील एमआयडीसी मधून एक विवाहिता घरी काहीही न सांगता घरातून निघून गेली असून याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील कुदरीहा येथील जयप्रकाश रामशरण राजभर हा शिरपुर कन्हाळा एमआयडीसी मधील सरगेरा फर्निचर येथे वॉचमनचे काम करून तेथेच पत्नीसह वास्तव्यास होता. दि.३० जुलै रोजी रात्री ९.३० वाजेच्‍या सुमारास त्‍याची पत्‍नी संध्या जयप्रकाश राजभर(वय २१)ही पतीला काहीही न सांगता घरून निघून गेली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली असून तपास पोहेकॉ प्रवीण पाटील हे करीत आहे.

Protected Content