चाळीसगावात “खान्देशातील पहिले आंबेडकरी चळवळ” ग्रंथाचे प्रकाशन

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव समाज प्रबोधनी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने “खान्देशातील पहिले आंबेडकरी चळवळ खंड-१” या ग्रंथाचे प्रकाशन रविवार रोजी शहरातील राजपूत मंगल कार्यालयात आयोजित केले असून मोठ्या संख्येने उपस्थितीत राहण्याचे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.

चाळीसगाव शहरात पहिल्यांदाच “खान्देशातील आंबेडकरी चळवळ खंड-१” या ग्रंथाचे प्रकाशन सोहळा रविवार, १७ आक्टोंबर रोजी शहरातील राजपूत मंगल कार्यालयात सकाळी १० वाजताच्या सुमारास आयोजित केले आहे. समाज प्रबोधीनी बहुउद्देशीय संस्था, चाळीसगाव संपादक प्रा. गौतम निकम,  प्रा.डॉ. सतीश मस्के, डी.एस.घोडेस्वार, प्रतापराव सांळुखे, बाबुराव वाघ व कल्पतेश देशमुख यांच्यामार्फत सदर प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान काल, आज आणि उद्या या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून सुबोध मोरे, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली सदर  कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

यावेळी जेष्ठ आंबेडकरी विचारवंतांची उपस्थिती लाभणार आहे. त्यात प्रामुख्याने लेखक ज.वि.पवार, (मुंबई), प्राचार्य डॉ. भी.ना. पाटील , (पाचोरा),  प्रा. डॉ. देवेंद्र इंगळे (जळगाव), दिलीप चव्हाण, प्रा. डॉ. राजश्री पगारे (नाशिक) व प्रा. डॉ. संबोधी देशपांडे ( चोपडा) व प्रा. डॉ. देवकुमार अहिरे ( पुणे) आदींचा समावेश असणार आहे. या मान्यवरांच्या उपस्थितीत “खानदेशातील आंबेडकरी चळवळ खंड -१”या महत्वपूर्ण ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. तसेच आंबेडकरी चळवळ या विषयावर चर्चा करण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन त्याचदिवशी दुपारी करण्यात आले आहे. त्यामुळे सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समाज प्रबोधीनी बहुउद्देशीय संस्थेने केले आहे.

Protected Content