भाजपा जिल्हा महानगरतर्फे धम्म प्रवर्तक दिनानिमित्त महापुरूषांच्या पुतळ्यास माल्यार्पण

जळगाव प्रतिनिधी । धम्म प्रवर्तक दिनानिमित्ताने शहरातील नविन बी.जे. मार्केट परिसरात भाजपा जिल्हा महानगरतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुध्द यांच्या पुतळ्याचे पुजन करून माल्यार्पण करण्यात आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, धम्म प्रवर्तक दिनानिमित्त जळगाव शहरातील नवीन बी.जे. मार्केट परिसरातील इंडीयन रेडक्रॉस सोसायटी समोर असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुध्द यांच्या पुतळ्याला भाजपा जिल्हामहानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, पूज्य भिकशू संघरत्न थेरो यांच्याहस्ते पुजन व माल्यार्पणाचा कार्यक्रम आज १४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता घेण्यात आला. याप्रसंगी जिल्हा प्रसिध्दी प्रमुख मनोज भांडारकर, अनुसूचित जाती अध्यक्षा लता बाविस्‍कर सामाजिक कार्यकर्ते अशफाक भाई, डॉ. गौतम नन्रवरे, गणेश सोनवणे, संतोष बाविस्रकर, नागेश सोनवणे, अजय देवगन, पुरुषोत्तम बाविस्कर, पराग ब्राह्मणकार इत्यादी उपस्थित होते.

Protected Content