पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा – भडगांव – जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळा असलेली बाजार समितीच्या भाजीपाला मार्केट विक्रीला नाशिक विभागीय सहनिबंधक यांच्या ” जैसे थे ” आदेशाला बॅंकेने उच्च न्यायालयातुन स्थगिती मिळवली आहे. त्यामुळे बाजार समिती गुपचूप विकण्याच्या इराद्यात असतांनाच शेतकरी उच्च न्यायालयात गेले असून दि. १५ एप्रिल रोजी यावर सुनावणी होणार आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, पाचोरा – भडगांव विधानसभा मतदारसंघातील आणि पाच तालुक्यातील शेतकऱ्यांची जिव्हाळाची असलेली कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मोक्याची जागा बॅंकेने कवडीमोल भावाने विक्रीचा घाट घातला आहे. बॅंकेच्या या धोरणा विरोधात आणि जिल्हा निबंधक सहकारी संस्था यांच्या विक्री परवानगी विरोधात बाजार समितीचे काही संचालकांसह शेतकरी म्हणून सचिन सोमवंशी यांनी नाशिक विभागीय सहनिबंधक मिंलीद भालेराव यांच्याकडे हरकत घेऊन लिलाव प्रकीयेला ” जैसे थे ‘आदेश मिळवला होता.
या आदेशावर सुनावणी अद्याप सुरु असतांना तसेच दावा प्रलंबित असतांना दि. ८ एप्रिल रोजी उच्च न्यायालयात बॅंकेने आपले म्हणणे मांडले की, ज्यांची मालमत्ता आहे. त्या कृषी उत्पन्न बाजार समितीने आंम्हाला विरोध करत नाही, तर ज्यांचा संबंध नाही असे लोक विरोध करीत आहे. ही एकतर्फी भुमिका लक्षात घेऊन या ‘जैसे थे’ आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश दिल्यानंतर ही बाब अत्यंत गोपनीय ठेऊन दि. १५ एप्रिल रोजी लिलाव जळगाव पिपल्स बॅंकेने स्वतः च्या शाखेत ठेवल्याचे उघड झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा देणारे सचिन सोमवंशी यांनी मा. उच्च न्यायालयात या स्थगिती आदेशाला आव्हान देत याचीका क्रमांक १३०८० /२०१९ दाखल केली. अॅड. भाऊसाहेब देशमुख यांनी उच्च न्यायालयात भुमिका मांडल्याने शेतकऱ्यांच्या या जागे संदर्भात तातडीने दि. १५ रोजी सकाळी १०.३० वाजता सुनावणी ठेवली आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.