वरखेडी येथे बँकेत लूटमार करणाऱ्या संशयिताला अटक

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील वरखेडी येथे बँक ऑफ महाराष्ट्र लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत सुत्रांनी दिलेली माहितीनुसार, जुबेर इकबाल तडवी (वय – २२) रा. कासली ता. जामनेर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या आधारे या गुन्ह्यातील संशयीत हा जामनेर तालुक्यातील कासली येथील रहीवाशी असल्याचे पो. नि. किरणकुमार बकाले यांना समजले होते. संशयीत जुबेर ईकबाल तडवी हा पहुर येथील आठवडे बाजारात गेला असल्याचे समजल्यानंतर पो. नि. किरणकुमार बकाले यांनी आपल्या पथकातील सहका-यांना पहुर येथे रवाना केले. पथकाने त्याला ताब्यात घेत चौकशी अंती व त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे अटक केली. जामनेर पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्याची देखील त्याने कबुली दिली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक अमोल देवढे, पोलिस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण  पाटील, पोलिस नाईक किशोर राठोड, पोलिस नाईक रणजीत जाधव, पोलिस कॉन्स्टेबल विनोद पाटील आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी काम पाहिले असून त्याला पुढील तपासकामी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!