जळगाव प्रतिनिधी । रावेर पोलिस स्टेशनला प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणे दाखल गुन्ह्यात फरार असलेल्या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
विलास सुपडू वाघोदे वय २१ रा. वडगाव ता. रावेर असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. सविस्तर माहिती अशी की, जिल्हाभरात विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या फरार व पाहिजे असलेले आरोपी यांना अटक करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे व अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. रावेर पोलिस स्टेशनला दाखल प्राणघातक हल्ल्यातील संशयितांबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सहायक फौजदार अशोक महाजन, अनिल इंगळे, अनिल देशमुख, कमलाकर बागूल , रमेश चौधरी अशोक पाटील या कर्मचार्यांच्या पथकाला सूचना केल्या होत्या. शनिवार १४ ऑगस्ट रोजी संशयित विलास वाघोदे त्याच्या राहत्या घरी आल्याची माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली. संशयितास पुढील कारवाईसाठी रावेर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे