पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील उद्या जिल्हा दौऱ्यावर

images 1530966717099 chandrakant patil

जळगाव, (प्रतिनिधी) राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील हे उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
शुक्रवार, दि. ८ मार्च २०१९ रोजी सकाळी ६.२० वाजता अमृतसर एक्सप्रेसने जळगाव रेल्वेस्थानक येथे आगमन व वाहनाने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी ६.४० वा. शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी ७.३० वा. जिल्हाधिकारी, जळगाव व इतर अधिकाऱ्यांसमवेत दुष्काळ आढावा व इतर विषयांबाबत चर्चा. (स्थळ: शासकीय विश्रामगृह, जळगाव), सकाळी ८.१५ वा.वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालय, जळगावकडे प्रयाण. सकाळी ८.३० वा. आगमन व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथील अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृहाचे ई उद्घाटनास उपस्थिती. (स्थळ : नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव), सकाळी ८.४५ वा. जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती. (स्थळ:नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव), सकाळी १०.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथून वाहनाने जळगाव विमानतळाकडे रवाना. सकाळी १०.४५ वा. जळगाव विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने पहूर हेलिपॅड, ता.जामनेरकडे प्रयाण. सकाळी ११.०० वा. पहूर हेलिपॅड, ता. जामनेर येथे आगमन व वाहनाने कार्यक्रमस्थळी रवाना. सकाळी ११.०५ वा. आगमन व विविध विकास कामांचे व रस्त्यांचे ई भूमीपूजन/उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १२.४५ वा. पहूर हेलिपॅड येथून हेलिकॉप्टरने महालक्ष्मी रेसकोर्स हेलिपॅड, मुंबईकडे प्रयाण.

Add Comment

Protected Content