रावेरातील दिव्यांगांचे उपोषण सुटले

 

रावेर : प्रतिनिधी । रावेरच्या  बीडीओ दिपाली कोतवाल यांच्या यशस्वी मध्यस्तीने स्वातंत्र्यदिनी सुरु असलेले अपंग बांधवाचे उपोषण मागे घेण्यात आले आहे.

 

जिल्हा वैद्यकीय आधिका-यांमार्फत सर्व आठही ग्रामसेवकांची पडताळणी करण्यात येणार असल्याचे लेखी आस्वासन उपोषणकर्त्याना देण्यात आले.

 

रावेर तालुक्यातील आठ ग्रामसेवकांचे बनावट प्रमाणपत्र प्रकरण तालुक्यात प्रचंड गाजत आहे.याच मागणीसाठी आज तालुक्यातील अपंग बांधवांनी पंचायत समिती कार्यालयसमोर  उपोषणाला सुरुवात केली होती  रावेरच्या  बीडीओ दिपाली कोतवाल यांच्या यशस्वी मध्यस्तीने स्वातंत्र्य दिनी सुरु असलेले हे उपोषण मागे घेण्यात आले आहे. जिल्हा वैद्यकीय आधिका-यांमार्फत सर्व आठही ग्रामसेवकांची पडताळणी करण्यात येणार असल्याचे लेखी आस्वासन उपोषणकर्त्याना देण्यात आले.

Protected Content