गावठी दारू बंद करण्यासाठी बामणोदकरांची पोलीस स्थानकावर धडक

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी | आपल्या गावासह परिसरात गावठी दारूचा अक्षरश: महापूर वाहत असतांना पोलीस कार्यवाही करत नसल्याचा निषेध म्हणून बामणोद येथील ग्रामस्थांनी फैजपूर पोलीस स्थानकावर धडक देऊन कार्यवाहीची मागणी केली.

या संदर्भात वृत्त असे की, गेल्या काही दिवसांपासून यावल तालुक्यात अवैध देशी-विदेशी, गावठी दारू विक्रीचे पेव फुटले आहे. फैजपूर परिसरातील अनेक गावांमध्ये हे चित्र आहे. त्यामुळे तरुणाई व्यसनाच्या आहारी जात आहे. बामणोद   येथे देखील अवैध दारू विक्री वाढल्याच्या तक्रारी आहे. या संदर्भात पोलीसांकडे तक्रार करून देखील यावर काहीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी थेट फैजपूर पोलीस स्थानक गाठून निवेदन दिले.

अलीकडेच  बामणोद येथील उमेश उर्फ जितू केदारे नावाच्या तरुणाचा गावठी दारू पिल्याने नुकताच मृत्यू झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप होता. तर पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडला असून आता तरी कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी केली

सावदा येथील सहायक पोलिस निरीक्षक इंगोले यांनी बामणोद परिसरातील गावठी दारू बंद करण्याचे आश्वासन दिल्यामुळे नागरिकांचा राग शांत झाला. नंतर ते घरी परत गेले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक मोहन लोखंडे, शेख, हेमंत सांगळे आणि कर्मचार्‍यांची उपस्थिती होती.

 

Protected Content