जळगावात अनधिकृत शेअर ट्रेडिंग उघड : चौघे ताब्यात

download 3

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील जयकिसन वाडी भागात शिवतीर्थ मैदानासमोर एका घरात अनधिकृतपणे शेअर ट्रेडिंग केले जात असल्याचे उघड झाले असून पोलिसांनी याप्रकरणी सायंकाळी चौघांना ताब्यात घेतले आहे.

 

पोलीस उप अधीक्षक डॉ.निलाभ रोहन यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी सायंकाळी ६.०० वाजेच्या सुमारास त्या घरी धाड टाकून हा प्रकार उघडकीस आणला. त्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह डी.बी. कर्मचारी व क्यू.आर.टी. पथकाला बोलावून चौकशीअंती चौघांना ताब्यात घेतले आहे. तसेच एक सी.पी.यू. आणि काही वाहने जप्त केली आहेत. अनधिकृत शेअर ट्रेडिंगचा प्रकार उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु होते.

Protected Content