पोलनपेठेतून दुचाकीची चोरी

two wheelar thift

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पोलन पेठ येथील एका दुकानदाराची दुचाकी चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, सत्यनारायण भगवानदास राठी (वय -58) रा. पोलन पेठ, बाहेती ब्रदर्स यांचे दुकानदार असून त्यांच्या दुकानातील सामान आणण्यासाठी दुचाकी क्रमांक एमएच 12 बीझेड 4701 ने सामानाची ने-आण करतात. 24 जून रोजी पार्किंगला लावलेली दुचाकी रात्री 8.30 ते 9 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत शहर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अकरम शेख करीत आहे.

Protected Content