Home Cities भुसावळ भाजप-सेनेच्या समन्वय बैठकीकडे लक्ष

भाजप-सेनेच्या समन्वय बैठकीकडे लक्ष

0
41

0Shivsena Bjp 45
0Shivsena Bjp 45

भुसावळ प्रतिनिधी । भाजप आणि शिवसेनेतील वादांचे निराकरण करण्यासाठी आज समन्वय बैठक आयोजित करण्यात आली असून यात नेमके काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

आज म्हणजेच ११ एप्रिल रोजी हॉटेल तनरीका येथे सायंकाळी सहा वाजता शिवसेना व भाजप युतीची समन्वय बैठक होत आहे. यामध्ये जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, राज्यमंत्री ना. दादा भुसे व ना. गुलाबराव पाटील, खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत रावेर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी व प्रमुख लोकप्रतिनिधी ची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख , शहरप्रमुख, उपजिल्हा संघटक, तालुका संघटक , शहर संघटक, महिला आघाडी प्रमुख पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गटप्रमुख, गणप्रमुख, विभागप्रमुख, युवासेना प्रमुख पदाधिकारी सर्व शिवसेनेच्या अंगीकृत संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत नेमके काय होणार याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound