Home Cities चाळीसगाव बारा बलुतेदार संघाच्या राज्य प्रवक्तापदी किसनराव जोर्वेकर

बारा बलुतेदार संघाच्या राज्य प्रवक्तापदी किसनराव जोर्वेकर

0
39

चाळीसगाव प्रतिनिधी । बारा बलुतेदार महासंघाच्या राज्य प्रवक्तापदी नुकतीच चाळीसगाव येथील राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष किसनराव जोर्वेकर यांची निवड करण्यात आली आहे.                       

तालुक्यातील टाकळी प्र.चा येथील किसनराव जोर्वेकर यांची नुकतीच बारा बलुतेदार महासंघाच्या राज्य प्रवक्तापदी निवड करण्यात आली आहे. हि निवड महासंघाचे अध्यक्ष कल्याणराव दळे यांनी केली आहे. याबाबत सर्व स्तरातून जोर्वेकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहेत. त्याचबरोबर अखिल भारतीय धोबी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र सरपंच असोशिएशनचे राज्य कार्याध्यक्ष,  चाळीसगांव ता.वि.का.सह.ग्रामोद्योग संस्थेचे चेअरमन, दै.सर्वांचा ग्रामस्थचे संपादक, टाकळी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच अशा विविध पदांवर किसनराव जोर्वेकर हे कार्यरत आहेत.

 


Protected Content

Play sound