पाटील दाम्पत्याच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा

यावल  प्रतिनिधी । यावल तालुक्यातील विरावली येथील आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार पाटील यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात आली.

विरावली येथे आज आषाढी एकादशीच्या निमित्ता शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य व यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आणि यावल तालुका शेतकी संघ माजी व्हाईस चेरमन व विद्यमान संचालक तुषार उर्फ मुन्नाभाऊ पाटील व सौ.गजश्री तुषार पाटील या दाम्पत्यांनी विरावली गावातील श्री विठ्ठल रुख्मिणीच्या मंदीरात  महापुजा केली.  राज्याला कोरोना विषाणूपासून मुक्ती मिळावी तथा राज्यातील बळीराजांचे दुबार पेरणीचे संकट टळावे याकरीता देवाला साकडे घातले, या महापुजेला मोठया संख्येने ग्रामस्थ हजर होते. यावेळी दर्शनार्थी भाविकांना तुषार पाटील यांच्या हस्ते फराळाचे वाटप करण्यात आले.

 

Protected Content