खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांच्या ईडी कोठडीत वाढ

मुंबई प्रतिनिधी | भोसरी येथील वादग्रस्त भूखंडाच्या खरेदी प्रकरणी ईडीच्या ताब्यात असणारे गिरीश चौधरी यांची कोठडी २६ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ५ जुलै रोजी अटक करण्यात आली असून खडसेंची चौकशी करण्यात आली आहे. तर त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना देखील चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलेले आहे. दरम्यान ईडीच्या कोठडीस असलेल्या गिरीश चौधरी यांना पहिल्यांदा पाच दिवस आणि नंतर आणखी चार दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांना १९ जुलैपर्यंत ईडी कोठडीत रहावे लागणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले होते.

आज गिरीश चौधरी यांची कोठडी संपत असल्याने त्यांना पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले. . गिरीश चौधरी यांना आता २६ जुलैपर्यंत ईडी कोठडीत पाठवण्यात आलं आहे. ईडीचा तपास अद्याप पूर्ण न झाल्यामुळे ईडीने पुन्हा एकदा कोठडीची मागणी केली होती. न्यायाझीश एस. एच. गवलानी यांनी गिरीश चौधरी यांच्या कोठडीत वाढ केली आहे.

Protected Content