जामनेर : प्रतिनिधी । मी आज तुमच्यासमोर मंचावर उभी राहुन बोलु शकते ते केवळ फुले , शाहु , आंबेडकरांमुळे . या महापुरुषांच्या संघर्षमयी त्याग भावनेमुळेच आज महिला पुरूषांच्या बरोबरीने वावरत आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी यांनी केले
आरक्षणाचे जनक राजर्षी शाहु महाराज यांना त्यांच्या जयंती दिनानिमित्त जामनेर राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने प्रतीमा पुजन करून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी यांनी शाहु महाराजांच्या प्रतिमेसमोर पुष्प उधळून अभिवादन केले.
यावेळी अशोक चौधरी, विलास राजपुत , राजेंद्र पाटील, किशोर पाटील , डॉ. प्रशांत पाटील , राजु नाईक, प्रल्हाद बोरसे , दिपक रिछवाल , नटवर चव्हाण , विनोद माळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते . राष्ट्रवादी पक्षाकडून पंचायत समितीच्या भोंगळ काराभाराविषयी बेमुदत सुरु आहे उपोषणस्थळी भेट देवुन वंदना चौधरी यांनी सविस्तर माहिती जाणुन घेतली.