Home राजकीय अखेर पवार कुटुंबातील वाद संपुष्टात

अखेर पवार कुटुंबातील वाद संपुष्टात

0
34

 

बारामती । आज बारामतीमध्ये पवार कुटुंबीयांच्या झालेल्या बैठकीत गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांवर चर्चा झाली असून यात अंतर्गत वादावर पडदा पडल्याची माहिती समोर आली आहे.

पार्थ पवार यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यात फोनवरून चर्चा झाली. त्यानंतर हा संपूर्ण वाद निवळल्याने शरद पवार हे पुण्याहून मुंबईला रवाना झाले. तर कुटुंबातील बैठक आवरून अजित पवार हे बारामतीहून पुण्यास रवाना झाले.

शरद पवार यांनी फटकारल्याने नाराज असणारे पार्थ पवार कुटुंबातील नातेवाईकांची भेट घेत होते. यामध्ये पार्थ यांची काका श्रीनिवास पवार यांच्या अनंतारा या निवासस्थानी बैठक झाली. यामध्ये पार्थ यांची समजूत घालण्यात आल्याची चर्चा आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, श्रीनिवास पवार, आई सुनेत्रा पवार, यांची उपस्थिती होती. यामध्ये पार्थ यांची समजूत घालण्यात आल्याची चर्चा आहे.


Protected Content

Play sound