टाकरखेडा शाळेत बाल-आनंद मेळावा उत्साहात साजरा

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | टाकरखेडा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत बाल-आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बाल-आनंद मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. रुपाली उघडे ह्या होत्या. त्यांच्या हस्ते बाल-आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य सौ आशा सपकाळ, सौ छाया पडोळ , सौ हुसेना तडवी, सुभाष भोई, आत्माराम सुरळकर, पोलीस पाटील समाधान पाटील, पालक नारायण लोहार, ज्ञानदेव पाटील, केंद्रप्रमुख विकास वराडे तसेच माता पालक, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

यावेळी शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक प्रभाकर तुकाराम पाटील (पी.टी.पाटील) यांनी बाल-आनंद मेळावा संदर्भात सांगितले की, विद्यार्थ्यांना व्यवहाराचे ज्ञान व्हावे तसेच देवाण घेवाण, नफा तोटा, विविध वस्तुंची ओळख, गर्दीतील धाडस, बोलण्याची पद्धत, वजनाचे प्रमाण, पैशाची ओळख व पैशांचा हिशोब , धाडस व संयम इत्यादी गुण यामधून घेता येतात.

बाल-आनंद मेळाव्यात भाजीपाला, भेळ, मटकी व हरभरा उसळ, पोहे, ढोकळे, पाणीपुरी, पोंगे, भजी, साबुदाणा वडा , लिंबू सरबत,समोसे, वडे, पाणी, केळी, कुरकुरे तसेच मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी स्वखर्चाने दादांचा स्टॉल यात सोनपापडी सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. इत्यादी चवदार खाद्यपदार्थ बाल-आनंद मेळाव्यात मांडण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा ओसंडून वाहत होता. मनसोक्तपणे विद्यार्थ्यांनी, पालकांनी, शिक्षकांनी बाल-आनंद मेळाव्याचा आनंद लुटला. बाल-आनंद मेळावा घेण्यासाठी शाळेतील शिक्षक जयंत शेळके, श्रीमती जयश्री पाटील, श्रीमती छाया पारधे, श्रीमती निर्मला महाजन, नाना धनगर, रामेश्वर आहेर तसेच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content