गावाचे पुर्नवसन करा संतप्त ग्रामवासीयांचे जिल्हाधिकाऱ्यांना सवाल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर तालुक्यातील सात्री गावातील नागरिकांनी १२ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आमचे पुर्नवसन करा आणि पाटचारी रस्त्याचे काम बंद कर यासाठी निवेदन दिले. हा रस्ता बेकायदेशीर आहे. गावाच्या सर्व रस्ते सुरळीत आहे. त्याबद्दल कुणाचीही तक्रार नाही. मात्र रस्त्यासाठी घाट का घातला आहे.

हा शेतकऱ्यांच्या अन्याय नाही का ? असा सवाल ग्रामवासी करत आहे. हा गाव पूर्णवसनात आहे. गावाला नुकतेच शासनाने ४ कोटी १३ लाख नुकतेच मंजूर केले आहेत असे असताना ही शासनाचा हा पैसा तिथे खर्च करावा व पुर्नवसन करावे अशी मागणी ग्रामवासीयांनी केली आहे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास सामूहिक आत्मदहन करू असा इशारा ग्रामवासियांनी दिला आहे.

Protected Content