धक्कादायक ! मुक्ताईनगर नगरपंचायत प्रशासनास राखीव दिव्यांग कल्याण निधी खर्च करण्याचा विसर

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर नगरपंचायत अंतर्गत सन २०१८-१९,२०१९-२०,२०२०-२१ मधील स्वउत्पन्नातून दिव्यांग कल्याणासाठी राखीव ५% निधी हेतू पुरस्कार वाटप न केल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे दि.१५/२/२०२४, रोज-गुरुवार,पासून होणाऱ्या आमरण उपोषणाबाबत करणार असल्याचा इशारा स्वाभिमाचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी दिला आहे

मुक्ताईनगर नगरपंचायत स्थापना ही दि. ३१ डिसेंबर २०१७ रोजी झालेली अजून निगरगट्ट नगरपंचायत प्रशासनाचे अनेक कटू अनुभव जनतेस वारंवार अनुभवास येत असून त्याचाच एक भाग म्हणजे नगरपंचायत प्रशासनाच्या स्वउत्पन्नातून दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधी खर्च बाबत दिव्यांगांना येत आहे.मुक्ताईनगर नगरपंचायत स्थापनेनंतर स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सन २०२१-२२ पासून त्यावरचे तात्कालीन मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांच्या कार्यकाळात दिव्यांग कल्याणकारी निधी खर्च करण्यास सुरुवात झालेली आहे परंतु त्या आधीचा अनुशेष अजूनही प्रलंबित आहे सन २०१८-१९,२०१९-२०,२०२०-२१ या तिन्ही आर्थिक वर्षांमधील दिव्यांग कल्याण साठी राखीव पाच टक्के निधी नगरपंचायत प्रशासनाने पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्णपणे उलटल्यानंतरही वारंवार मागणी करूनही खर्च केलेला नाही. विशेष खेदाची बाब म्हणजे सर्वसामान्य जनतेकडून कर वसुलीसाठी वेगवेगळ्या सकल लढवून नोटीसा पाठवून जनतेचे नाव बॅनरवर चौकाचौकात लावून कर वसुली तर करत आहे.

परंतु दिव्यांग हितार्थ राबवण्यात येणाऱ्या योजनांकडे मुक्ताईनगर नगरपंचायत प्रशासन हेतू पुरस्कार दुर्लक्ष करत आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या आदेशानुसार मुक्ताईनगर नगरपंचायत प्रशासनाने त्यांच्या उत्पन्नातील दिव्यांग कल्याणासाठी राखून ठेवलेला ५% निधी तात्काळ खर्च करण्याबाबत तात्काळ परिपत्रक न काढल्यास दि.१५/२/२०२४ रोजी पासून जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्क व संरक्षणार्थ आमरण उपोषणाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. यांनी दिला आहे

Protected Content