छात्र सैनिकांचा प्लास्टिक संकलन करून पुनीत सागर अभियानात सहभाग (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पुनीत सागर अभियानांतर्गत    १८ महराष्ट्र एन. सी. सी. बटालिअन जळगावतर्फे मेहरूण तलाव व परिसरात प्लास्टिक संकलन करण्यात आले.

 

जळगाव शहरातील मेहरूण तलावाची स्वच्छता पुनीत सागर अभियानांतर्गत १८ महराष्ट्र एन. सी. सी. बटालिअन जळगावतर्फे करण्यात आली. या अभियानांतर्गत तलाव व परिसरातील प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी १०० छात्र सैनिक स्वच्छता करण्यात आली.  याप्रसंगी छात्र सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी नगरसेविका अॅड. शुचिता हाडा, दीपमाला काळे, नगरसेवक बंटी जोशी, राजेंद्र घुगे पाटील, अग्निशमन दलाचे कर्मचारी उपस्थित होते.   या अभियानात मुळजी जेठा महाविद्यालयाचे ४०, एन. एम. महाविद्यालयाचे १५ तसेच बेंडाळे  महाविद्यालयाचे १५ छात्र सैनिक सहभागी झाले होते. हे अभियान प्रशाकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल पवन कुमार यांच्या नेतृत्वाखाली सुभेदार मेजर प्रेम सिंग, सुभेदार सुनील पालवे, सीएचएम, बीएचएम, हवालदार  यांच्या उपस्थितीत राबविण्यात आले. याश्वितेसाठी  एन.सी. सी. अधिकारी लेफ्टनंट (डॉ.) योगेश बोरसे, सीटीओ गोविंद पवार यांनी  कामकाज पाहिले.

 

Protected Content