शिव कॉलनीतून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शिवकॉलनी परिसरातून एकाची १२ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे समोर आले आहे, याबाबत मंगळवार २२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामानंदनगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संदीपकुमार दिवाकर सिसोदे (वय-53, रा. शिवकॉलनी, जळगाव ) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. १९ नोव्हेंबर सायंकाळी ७ वाजता त्यांच्या घरासमोर त्यांची दुचाकी (एमएच १९ एटी ९०८०) ही पार्किंगला लावली होती. आज्ञात सोडताना ही १२ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला. परंतु दुचाकी कुठेही मिळून न आल्याने अखेर रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून मंगळवार २२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक जितेंद्र तावडे करित आहे.

 

 

Protected Content