जळगाव प्रतिनिधी । शहरातील श्रीनिवास कॉलनी ६० वर्षीय महिला घरासमोर बसलेल्या असतांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गळ्यातील ३० हजार रूपये किंमतीचे सोन्याची चैन व मंगळसुत्र तोडून लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, सुनिता सुरेश पाटील (वय-६०) रा. श्रीनिवास कॉलनी जळगाव ह्या आपल्या कुटुंबियांसह राहतात. बुधवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास त्या त्यांच्या घरासमोर उभ्या असतांना एक अनोळखी ३५ ते ४० वर्षीय तरूण आला. त्याने महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातील ३० हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन आणि मंगळसुत्र तोडून लंपास दुचाकीवरून दोघे जण पसार झाले. याप्रकरणी सुनिता पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि. विलास शेंडे करीत आहे.