फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांवर आरोपपत्र दाखल

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – वरिष्ठ राजकीय नेत्यांचे अनधिकृत रित्या फोन टॅपिंग केल्या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधातआरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

राज्याच्या गोपनीय वार्ता शाखेत कार्यरत असताना राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे तसेच खा. संजय राऊत यांच्या दूरध्वनीवर होणाऱ्या संभाषणाचे ध्वनीमुद्रण फोन टॅपिंग केले जात असल्याचा आरोप आहे.  या संदर्भात कुलाबा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे आणि खा. राऊत यांचे जबाब नोंदवले असून त्यासोबतच ६ सरकारी अधिकाऱ्यांचे जबाब कलम १६४ अंतर्गत नोंदवण्यात आले आहेत.
हैदराबाद येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अप्पर पोलीस महासंचालक म्हणून केंद्रीय प्रतिनियुक्तीवर असलेल्या रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदा दूरध्वनी अभिवेक्षण प्रकरणी कुलाबा पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. कुलाबा पोलिसांनी दाखल केलेल्या ७०० पानांच्या आरोपपत्रात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि खा. राऊत यांच्यासह सुमारे २० शासकीय कर्मचाऱ्यांच्या जबाब नोंदवण्यात आला असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

राज्य गुप्तवार्ता विभागात कार्यरत असताना वरिष्ठ पोलीस अधिकारी शुक्ला यांनी एकनाथ खडसे व शिवसेना नेते संजय राऊत यांच्या दूरध्वनीचे बेकायदा अभिवेक्षण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती नेमण्यात आली होती. त्यानुसार कुलाबा पोलिसांनी  खा . संजय राऊत व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचाही जबाब नोंदवला होता. याशिवाय ६ सरकारी अधिकाऱ्यांचे जबाब कलम १६४ अंतर्गत नोंदवण्यात आले आहेत. याच समितीने राज्य सरकारला अहवाल सादर केल्यानंतर कुलाबा पोलिसांनी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Protected Content