आरोप करणाऱ्यांनी पावती दाखवून देणगी परत घ्यावी — साक्षी महाराज

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । खासदार साक्षी महाराज यांनी राम मंदिर ट्रस्टच्या जमीन खरेदीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना पावती दाखवून देणगी परत घेण्याचे  आवाहन केले आहे.  ते  निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.

 

त्यांनी आम आदमी पक्षाचे संजय सिंह आणि सपाचे माजी आमदार पवन पांडे यांच्यावर टीका केली.

 

साक्षी महाराज म्हणाले, “ज्या पक्षाच्या प्रमुखांनी कारसेवकांवर गोळीबार केला होता. तेथे आज राम मंदिर बांधले जात आहे. त्यामुळे अशा लोकांना हे पचत नाही. राम मंदिर ट्रस्टचे चंपत राय यांनी आपले संपूर्ण जीवन भगवान रामसाठी समर्पित केले आहे, असा दावा देखील त्यांनी केला आहे. म्हणून, अशा व्यक्तीवर आरोप करणे पूर्णपणे निराधार आहे. आपण देणग्यांबद्दल बोलत असला तर आपण हिशोब घेऊ शकता किंवा पावती दाखवून देणगी परत घेऊ शकता” असे अवाहन साक्षी महाराज यांनी खासदार संजय सिंह आणि अखिलेश यादव यांना केले आहे.

 

साक्षी महाराज म्हणाले की, राम मंदिराचा तीव्र विरोध करणारे हे लोकं आहेत. ते म्हणायचे की राम मंदिराच्या नावाने अयोध्येत वीट ठेवता येणार नाही. आज त्याच अयोध्येत भगवान राम यांचे मंदिर बांधले जाणार आहे.

 

‘आप’चे खासदार संजय सिंह यांच्या दाव्यानुसार, राम जन्मभूमीलगत असणाऱ्या या जमिनीची १८ मार्च २०२१ रोजी खरेदीसाठी नोंदणी करण्यात आली आणि त्या वेळी जमिनीची किंमत २ कोटी दाखवण्यात आली. सपचे नेते पवन पांडे यांनी दोन मूळ मालकांची, तसेच दोन खरेदीदारांची नावे पत्रकार परिषदेत उघड केली. या खरेदीदारांनी ही जमीन ५.७ कोटी रुपयांना खरेदी केली. हा जमीन खरेदीचा व्यवहार झाल्यानंतर दोन्ही खरेदीदारांनी पुढील १० मिनिटांमध्ये ही जमीन राम जन्मभूमी न्यासाला १८.५ कोटींना विकल्याचा दावाही या नेत्यांनी केला,

 

Protected Content