नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात औषधांचा तुटवडा आहे. उपचाराअभावी रोज हजारो रुग्णांचा मृत्यू होत आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शन केंद्र सरकार अमेरिका आणि इजिप्त देशाकडून मागवणार आहे. 4.5 लाख रेमडेसिव्हीर मागवले आहेत.
भारत सरकारने अमेरिका आणि इजिप्तमधील दोन औषधी कंपन्यांकडून 4.5 लाख रेमडेसिव्हीरचे इंजेक्शन मागवले आहेत. पहिल्या टप्प्यात शुक्रवारी एकूण 75 हजार रेमडेसिव्हीरचे इंजेक्शन उपलब्ध होतील. केंद्राने दिलेल्या माहितीनुसार सध्याची औषधांची कमतरता लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार केंद्राच्या मालकीची असलेली सरकारी कंपनी HLL लाईफकेअर लिमिटेड ने 4.5 लाख रेमडेसिव्हीरच्या डोससाठी अमेरिका आणि ईजप्तमधील कंपन्यांशी बातचित केली आहे. यामध्ये अमेरिकेची मेसर्स गिलिएड साईसिज इंक ही कंपनी पुढच्या एक किंवा दोन दिवसांत 75 हजार ते 1 लाख रेमडेसिव्हीरचे इंजेक्शन देणार आहे. त्यांतर 15 मे पर्यंत आणखी 1 लाख नवे इंजेक्शन या कंपनीकडून मिळतील.
इजिप्तच्या ईवा फार्मा कंपनी सुरुवातीला 10,000 रेमडेसिव्हीरचे इंजेक्शन पाठवेल. त्यानंतर प्रत्येक 15 दिवसांनी आणखी 50 हजार नवे रेमडेसिव्हीरचे इंजेक्शन ही कंपनी देईल.
रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या खरेदीबाबत परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी माहिती दिली त्यांनी भारत देश मिस्र येथून तब्बल 4,00,000 रेमडेसिव्हीरचे इंजेक्शन करेदी करण्याचा विचार करणार आहे असं संगितलं होतं.संयुक्त अरब अमिरातीबांगलादेश आणि उझबेकिस्तान येथूनसुद्धा इंजेक्शन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे, असंसुद्धा त्यांनी सांगितलं होतं.
देशात सध्या प्रतिदिन 67,000 रेमडेसिव्हीर इंजेक्शनचं उत्पादन होत आहे. मात्र, देशाला सध्या प्रतिदिन 2-3 लाख इंजेक्शनची गरज आहे. त्यामुळे सरकार रेमडेसिव्हीरचं देशांतर्गत उत्पादन वाढवण्याचा विचार करत आहे. खबरदारी म्हणून सरकारने रेमडेसिव्हीर तसेच इतर पुरक साधनांच्या निर्यातीवरसुद्धा बंदी घातलेली आहे.