भुसावळ प्रतिनिधी । शहरातील अप्सरा चौकातून एकाचा दीड हजार रूपये किंमतीचा सायकल लांबविली असून भुसावळ बाजार पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, धनश्री संतोष अट्रावलकर (वय-२१) रा. शिरपूर कन्हाळ रोड तुकाराम नगर ह्या ११ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजेच्या कामानिमित्त शहरातील अप्सरा चौकात आल्या. त्यावेळी त्यांनी क्रिष्णा डेंटल हॉस्पिटल समोर लावली होती. दुपारी १२ वाजता परत आल्यानंतर जागेवर सायकल मिळून आली नाही. शोधाशोध करून मिळून आली नाही. याप्रकरणी भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहेकॉ मिलीद कंक तपास करीत आहे.