कुसुंबा येथे दारूच्या नशेत विवाहितेसह मुलाला मारहाण; एकावर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । दारूच्या नशेत शेजारी राहणाऱ्या विवाहितेला अश्लिल शिवीगाळ करून तिच्या मुलाला बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना तालुक्यातील कुसुंबा येथे शनिवारी दुपारी घडली. याप्रकरणी एकावर एमआयडीसी पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दिलेल्या फिर्यादीनुसार, रेखा रामदास पाटील (वय-३६) रा. कुसुंबा ता.जि.जळगाव ह्या पती, मुलगा आणि मुलगी अश्यांसह राहते. त्याच्या घराच्या शेजारी राहणारा संशयित राजेश विष्णू पाटील हा शनिवार ६ जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास दारूच्या नशेत येवून काहीही कारण नसतांना रेखा पाटील यांना अश्लिल शिवीगाळ करू लागला. याचा जाब विचारला असता विवाहितेला मारहाण करण्यास सुरूवात केली. हे पाहून विवाहितेचा मुलगा चेतन रामदास पाटील याला देखील मारहाण केली तर त्यांच्या कानाला चावा घेतला. तसेच कुटुंबातील सदस्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली. विवाहिता रेखा पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीस पोलीस ठाण्यात संशयित आरोपी राजेश पाटील यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Protected Content