Breaking : दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्तीमुळे यंदाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्या असून शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज ही घोषणा केली.

राज्यात कोरोनाचे रूग्ण मोठ्या संख्येने वाढले आहेत. दररोज रूग्णांची संख्या वाढली असून अनेक ठिकाणी तर बेड आणि औषधींचा तुटवडा आढळून येत आहे. या अनुषंगाने दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे नेमके काय होणार याबाबत सर्वांना उत्सुकता होती.

या पार्श्‍वभूमिवर, राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडी यांनी दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याची घोषणा केली. बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस तर दहावीची परीक्षा जून महिन्यात होणार आहे.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एका व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती दिली आहे.

Protected Content