चोपडा प्रतिनिधी । शहरातील मल्हारपूरा परिसरातील तरूणाची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, प्रफुल्ल विजय चव्हाण (वय-३२) रा. मल्हापूरा पाटीलवाडा चोपडा हे खासगी नोकरी करतात. त्यांच्याकडे कामासाठी (एमएच १९ सीपी १५९०) क्रमांकाची दुचाकी आहे. १० एप्रिल रोजी रात्री १ ते सकाळी ६ वाजेच्या दरम्यान त्यांच्या घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.



