जळगाव, प्रतिनिधी । शिवसेनेतर्फे आज महापौर व उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन पत्र घेतले. यावेळी नामनिर्देशन पत्र घेण्यासाठी शिवसेनेची नगरसेवक यांनी पालिकेत नगरसचिव कार्यलयात जाण्यापूर्वी महापालिकेच्या मुख्य द्वारातून प्रवेश करतांना जय भवानी जय शिवाजीचा नारा देत प्रवेश केला. यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राचे दर्शन घेतले.
नगरसचिव कार्यालयात जावून शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौर व उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन पत्र घेतले. भाजपचे काही नगसेवक हे सहलीला गेले असल्याची चर्चा योग्य असल्याचे सांगून महापौर व उपमहापौरपदासाठी नामनिर्देशनपत्र घेतले असून उद्या अर्ज दाखल करू असे शिवसेनेचे नितीन बरडे यांनी स्पष्ट केले. ललित कोल्हे यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत चर्चा एकत आहे, व्हाटसअपद्वारे समजते असून याबाबत आमच्या वरिष्ठांकडे जास्त माहिती असेल असे श्री. बरडे यांनी स्पष्ट केले. प्रशांत नाईक यांनी शहराच्या आमदारांवर नाराजी असल्याने हे सर्व नाट्य घडत असल्याचा दावा करत चमत्कार घडणार असल्याचे सूचक वक्तव्य केले. तर अमर जैन यांनी सांगितले की, जळगावकरांची अपेक्षा फोल ठरली असल्याने ती अस्वस्थता पुढे आली असून महापौर हा शिवसेनेचाच असेल याचा पुनरुच्चार केला.
https://www.facebook.com/508992935887325/videos/342544927168671