चोरीच्या वस्तू विकून मौजमजा करणारा गजाआड; एलसीबीची कारवाई

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील मन्यारखेडा शिवारातील एमआयडीसीतून शेतीचे साहित्य व कंपनीतील वस्तू चोरून बाहेर फौजमजा करणाऱ्या नेणाऱ्या संशयित आरोपी गजाआड झाला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील मन्यारखेडा शिवारात एमआयडीसी भागातून शेतीसाठी लागणारे साहित्य तयार करण्याची कंपनीतून कामाचे वस्तू ६ एप्रिल २०२१ ते २७ एप्रिल २०२१ दरम्यान चोरीस गेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांनी पथक तया करून पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर आंभोरे, नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, राहूल पाटील यांनी करत संशयित आरोपी अरविंद उर्फ आरो अरूण वाघोदे (वय-२५) रा. सुप्रिम कॉलनी नितीन साहित्या नगर जळगाव याला आज ३ ऑगस्ट रोजी पहाटे राहत्या घरातून अटक केली. त्याच्याजवळून ७ हजाराची रोकड जप्त करण्यात आली आहे. पुढील कारवाईसाठी नशिराबाद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

 

Protected Content