महाबळ परिसरात एकाचा जबरीने मोबाईल लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील महाबळ परिसरातील छत्रपती संभाजी नाट्यगृहाजवळील रस्त्यावर चोरट्याने एका जणाचा जबरीने मोबाईल लांबविल्याची घटना गुरुवार १३ एप्रिल रोजी दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एका जणासह लहानमुलाविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

जळगाव शहरातील इंद्रनिल सोसायटी येथे नितीन रमेश सोनवणे हे वास्तव्यास आहेत. ते गुरुवारी दुपारी छत्रपती संभाजी नाट्यगृहाजवळील संभाजी नाट्यगृह परिसरात बाजारात आले होते.  यादरम्यान त्याचा मोबाईल एक लहान मुलगा व एका अनोळखी व्यक्तीने जबरीने हिसकावून नेला. प्रकार लक्षात आल्यानंतर नितीन सोनवणे यांनी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक गोपाल देशमुख हे करीत आहेत.

Protected Content