मुकेश सपकाळे खून प्रकरणातील संशयित आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

जळगाव प्रतिनिधी । मु.जे.महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये आसोदा येथील मुकेश सपकाळे खून प्रकरणातील संशयित आरोपी किरण अशोक हटकर याचा जामीन अर्ज आज जिल्हा व सत्र न्यायालयाने नामंजूर केला आहे. 

२९ जुन २०१९ रोजी शहरातील मु.जे. महाविद्यालयाच्या पार्किंग परिसरात मोटारसायकलवरील तीन जणांनी अचानक ब्रेक दाबल्याने धक्का लागल्याच्या कारणावरून फिर्यादी रोहित मधुकर सपकाळे याला मारहाण केली होती. त्यानंतर त्याच कॉलेजमध्ये शिकत असलेला फिर्यादीचा मोठा भाऊ मुकेश उर्फ महेश सपकाळे याला फोन करून पार्किंगमध्ये बोलावेल. तेथे मुकेश आल्यानंतर तिघांनी मुकेशला मारहाण केली व त्यातील एकान कमरेतील धारदार शास्त्राने वार करून खून केला होता. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील अटकेत असलेला संशयित आरोपी किरण अशोक हटकर याने आज जिल्हा न्यायालयातील न्यायाधीस एस.जी.ठुबे यांच्याकडे जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायाधिश ठुबे यांनी संशयित आरोपी किरण हटकर यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. सरकारपक्षातर्फे सरकारी वकील पंढरीनाथ चौधरी करीत आहे.

 

पहा : या धक्कादायक घटनाक्रमाचा व्हिडीओ

मुकेश सपकाळे खून प्रकरण : पाच संशयितांना चार दिवसाची पोलीस कोठडी

मुकेश सपकाळे खून प्रकरण : पाच आरोपींना पुण्यातून अटक

Protected Content