घरात उंचावरून पडल्याने महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील स्वामी विवेकानंद नगरातील राहत्या घरी उंचावरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या ४७ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घडना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी २५ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील स्वामी विवेकानंद नगर परिसरात जयश्री गजेंद्र ओझा (वय-४७) या आपल्या परिवारासह वास्तव्याला होत्या. २३ फेब्रुवारी रोजी जयश्री ओझा ह्या घरी काम करत असतांना उंचावरून खाली पडल्या. या त्यांच्या दोन्ही पायांना आणि कमरेला गंभीर दुखापत झाली व मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता. जखमीवस्थेत त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना शनिवारी २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालविली. या घटनेबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ तुषार जावरे करीत आहे.

Protected Content