वाघनगरात तरूणीला नोकरी आमिष दाखवत ३१ हजाराची फसवणूक

जळगाव प्रतिनिधी । इंडिगो एअरलाइन्स डेमोस्टिक कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून वाघ नगरातील २६ वर्षीय तरुणीची ३१ हजार रुपयात फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मंगळवारी २५ जानेवारी रोजी रात्री जळगाव तालुका पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुका पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीनाक्षी विश्वासराव इंगळे (वय-२६) रा. वाघ नगर सावखेडा शिवार, जळगाव ही तरुणी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ८ जुलै २०२१ रोजी त्यांचा नंबरवर एका अनोळखी नंबरने मेसेज टाकून इंडिगो एअरलाइन्स डेमोस्टीक येथे नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. यासाठी त्यांनी १३ जुलै रोजी १३ हजार रूपये ऑनलाईन पध्दतीने पैसे ट्रान्सफर केले. पैसे भरून नोकरी मिळाली नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे समजले. तरूणीने मंगळवारी २५ जानेवारी रोजी रात्री १२ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.  तरूणीच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलिस ठाण्यात संशयित आरोपी बँक अकाउंट धारक सनोज कुमार, अवंतिका ठाकूर, सिमरन आणि प्रीती  (पुर्ण नाव माहित नाही) यांच्यासह एक जण असे एकुण ५ जणांविरोधात. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल फेगडे करीत आहे.

Protected Content