गांजा कनेक्शन : राजस्थानच्या पोलिसांची वनकोठे येथे झाडाझडती

जळगाव प्रतिनिधी | राजस्थानातील निंबाहेडा पोलीस स्थानकात गांजा तस्करीबाबत एरंडोल तालुक्यातील वनकोठे येथील एकाचा संबंध असल्याचे दिसून आल्याने राजस्थान पोलिसांनी तेथे जाऊन कसून चौकशी केली.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सुमारे तीन महिन्यांपूर्वी राजस्थानातील चित्तोडगड जिल्ह्याच्या निम्बाहेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गांजाची तस्करी करण्याच्या आरोपातून पोलिसांनी तीन जणांना अटक केली. यातील गणेश चौधरी व अनिल सोनवणे (दोघांची पूर्ण नावे माहीत नाही) हे दोघे जळगावातील रहिवासी आहेत तर शंकरदास बैरागी हा भिलवाडा येथे राहतो.

दरम्यान, अटकेतील गणेश चौधरी याचे कॉल डिटेल तपासले असता त्यात घटनेच्या दिवशी त्याचे जयसिंग सोबत सर्वाधिकवेळा बोलणे झाल्याचे समोर आले. तसेच जयसिंग हा देखील आपला साथीदार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार उपनिरीक्षक गोपालनाथ यांच्यासह दोन कर्मचारी शुक्रवारी वनकोठ्यात आले. त्यांनी कासोदा पोलिस ठाण्यात नोंद करून स्थानिक पोलिसांच्या मदतीने वनकोठ्यात जाऊन जयसिंगच्या घरी तपासणी केली. परंतु, जयसिंग मिळून आला नाही.

कासोदा पोलीस स्थानकाच्या सपोनि निता कायटे यांनी राजस्था पोलिसांच्या पथकाला मदत केली. काल दुपारी हे पथक राजस्थानला परत गेले.

Protected Content