रॅबिजमुळे शिरसाळा येथील प्रौढाचा मृत्यू

dead body on track

जळगाव प्रतिनिधी । दोन महिन्यापूर्वी गावातून शेतात जात असताना कुत्र्याने चावा घेतल्याने जखमी झालेल्या रूग्णाची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने मंगळवारी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान प्रकृती अत्यवस्थ झाल्याने बुधवारी सकाळी दहा वाजता रूग्णाचा मृत्यू झाला.

याबाबत माहिती अशी की, शांताराम सिताराम कोळी (४२) रा. शिरसाळा (बोदवड) यांना दोन महिन्यापूर्वी शांताराम कोळी हे गावातून शेतात जात असताना कुत्र्याने त्यांच्या पायाला चावा घेतल्याने ते जखमी झाले होते. पायाला कुत्र्याने चावा घेतला परंतु त्यांनी त्याकडे फारसे गांभीर्याने घेतले नाही. दरम्यान मंगळवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास त्यांना असह्य त्रास होऊ लागला. उलटया होऊ लागल्या. पाणी पिणेही त्यांना अवघड होऊ लागल्याचे दिसल्यानंतर कुटुंबियांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात रात्री हलविले. त्यांच्यावर उपचार सुरू होता, परंतु उपचाराला प्रतिसाद मिळू शकत नव्हता. आज सकाळी 10 वाजता त्यांचा मृत्यू झाला. शांताराम कोळी यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या अकस्मात मृत्यूने कुटुंबियांसह नातेवाईकांना जबर धक्का बसला.

Protected Content