विद्यापीठाचे वित्त लेखाधिकारी गोहील यांचाही राजीनामा

जळगाव प्रतिनिधी | कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्रभारी कुलसचिवांनंतर वित्तलेखा अधिकारी एस.आर.गोहील यांनी देखील राजीनामा दिल्याने चर्चेला उधाण आले आहे.

शिक्षकेतर कर्मचारी कृती समितीच्या आक्रमक पवित्र्यामुळे प्रभारी कुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकर यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. याच्या पाठोपाठ विद्यापीठातील वित्तलेखा अधिकारी एस.आर.गोहील यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा कुलगुरू प्रा.ई वायुनंदन यांच्याकडे दिला आहे. भादलीकर यांच्या राजीनाम्यामागे कर्मचारी संघटनेची ठाम भूमिका असली तरी गोहिल यांनी मात्र नेमक्या कोणत्या कारणावरून राजीनामा दिला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

वित्त व लेखाधिकारी गोहिल यांनी वाढीव खर्चाच्या कामांना मंजुरी देण्यास नकार दिल्यामुळे त्यांच्यावर दबाव वाढला असून यातून त्यांनी राजीनामा दिल्याचे मानले जात आहे. तथापि, त्यांनी याबाबत काहीही माहिती दिली नाही. एस. आर. गोहिल हे आज आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता असून यात ते नेमके काय कारण सांगणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content