जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील नोंदणीकृत व नोंदणी जिवीत असलेल्या बांधकाम क्षेत्रातील कामगारांना 2017 पासून कल्याणकारी मंडळाचे योजनांचे लाभ मिळत नसल्याबद्दल आज 21 जानेवारी 2019 रोजी सहाय्यक कामगार कार्यालयासमोर सीतूतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम क्षेत्रातील कामगारांना कल्याणकारी मंडळाचे योजनांचे लाभ 2017 पासून थकीत असून कल्याणकारी मंडळाचे थकीत लाभ कामगारांना दरवर्षी शिष्यवृत्ती, आरोग्य, प्रसूती अनुदान, विवाह अनुदान, अवजारे खरेदी अनुदान, कोरोना अनुदान यांची सातत्याने मागणी करीत असून आजपर्यंत कामगार उपायुक्त कार्यालयात तीन विभागीय बैठकांमध्ये चर्चेअंती वरील मागण्यांबाबत 2 जानेवारी 2020 रोजी झालेल्या बैठकीत शासनाचे कामगार विभागाचे अधिकारी, बांधकाम कामगार, कामगार यांचे राज्यस्तरीय नेते डॉ.डी.एस. कराड, सिताराम ठोंबरे यांच्या बैठकीत मागण्या मंजूर झाल्यावर देखील आजपर्यंत कुठल्याही अनुदानाचा लाभ मिळालेला नाही.
दरम्यान, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय जळगाव जिल्ह्यात असून देखील कोणतेही काम करीत नाही. बांधकाम कामगारांच्या बोगस नोंदणी नूतनीकरण प्रक्रियेत सुद्धा अनेक गावात 1 हजार 700 ते 2 हजार रुपयांपर्यंत बांधकाम कामगारांची परस्पर नोंदणी करून त्यांना स्मार्ट कार्ड व सेफ्टी किट दिले जात आहे. व 2021 पासून नोंदणीकृत व आतापर्यंतचे नोंदणी झालेले जीवित कामगारांना उद्दिष्ट पूर्वक शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या लाभापासून वंचित ठेवले जात आहे. अनेक वेळा लोकशाही मार्गाने मागणी करून सुद्धा कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे कामगारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या आहेत मागण्या
सन 2017 पासून थकीत कल्याणकारी मंडळाचे लाभ त्वरित कामगारांच्या खात्यात वर्ग करावा, विभागीय बैठकीत झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी करावी, नोंदणी प्रक्रिया नूतनीकरण व कल्याणकारी योजनांचे लाभाचे अर्ज दाखल करताना पारदर्शकता आणावी, नवीन नोंदणी रजिस्टर रजिस्ट्रेशन करणाऱ्या एनजीओ ऑनलाईन नोंदणी करताना नियमबाह्य पद्धतीने नोंदणी करीत असून कामगारांकडून नोंदणीसाठी रुपये 2 हजार रुपये पर्यंत बेकायदेशीर रित्या होत असून कामगारांना जागेवरच स्मार्टकार्ड व सेफ्टी किट देत असून त्यांची चौकशी व्हावी, कामगारांची होत असलेली पिळवणूक व फसवणूक थांबवावी यासह आदी मागण्यांसाठी आज सहाय्यक कामगार कार्यालयासमोर सितू च्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आले.
https://www.facebook.com/508992935887325/videos/424535432305604