जळगाव विमानतळावर पंतप्रधान मोदी यांचे स्वागत

जळगाव प्रतिनिधी । आज दुपारी धुळे येथील सभेला जाण्यासाठी पंतप्रधान मोदी हे विमानतळावर आले असता त्यांचे स्वागत करण्यात आले.

बहिणाबाईंचे पुस्तक देऊन स्वागत

पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस हे विमानाने जळगाव येथे आले असून यानंतर हे हेलीकॉप्टरने धुळे येथे रवाना झाले. त्यांच्या विमानाचे आगमन झाल्यानंतर आमदार राजूमामा भोळे यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी महापौर सीमा भोळे, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. वायू सेनेचे विशेष जळगाव विमानतळावर दुपारी 2.07 मिनिटांनी आगमन झाले आगमन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत जळगावच्या महापौर सीमा भोळे यांनी बहिणाबाई चौधरी याच्या पुस्तकाच्या हिंदी आवृत्ती देऊन केले यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा उज्जला पाटील, जिल्हाधिकारी डॉ ठाकणे, आ सुरेश भोळे उपस्थित होते. यावेळी विमानतळावर आ. स्मिता वाघ,उपजिल्हाधिकारी गोरक्ष नाथ गाडीलकर, एस पी दत्ता शिंदे ,याच्या महसूल विभाग चे आयुक्त व कर्मचारी उपस्थित होते. मोदी यांच्या सोबत विमानात महाराष्ट्र राज्यपाल,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना, नितीन गडकरी होते. धुळे येथील कार्यक्रमाला जाण्यासाठी तीन हेलिकॉप्टर ने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना नितीन गडकरी दुपारी 2.22 मिनिटांनी रवाना झाले.

कडेकोट बंदोबस्त

यावेळी विमानतळाला छावणी चे स्वरूप आले होते वायू सेना, स्थल सेना, नैसेना याची हेलिकॉप्टर होती. विमानतळावर 7 अग्निशमन दलाचे बंब, 7 रुग्णवाहिका, डॉक्टर, नर्स, प्राधिकरण व पोलीस याचे मिळून 800 जण बंदोबस्त साठी तैनात करण्यात आले होते यासह एसपीजीच्या फोर्स ने विमानतळाचा आतील ताबा घेतला होता

Add Comment

Protected Content