चंद्रकांत भंडारी यांच्या पुस्तकात उपक्रमशील शिक्षकाची प्रेरणादायी कथा ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । येथील लेखक, शिक्षणतज्ज्ञ तथा केसीईचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी यांनी पीटर ताबीची या ग्लोबल टीचर प्राईजने सन्मानीत उपक्रमशील शिक्षकाची अतिशय प्रेरणादायी कथा पुस्तकाच्या स्वरूपात मांडली असून आज याचे प्रकाशन करण्यात आले.

येथील लेखक, शिक्षणतज्ज्ञ तथा केसीईचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी यांनी पीटर ताबीची या ग्लोबल टीचर प्राईजने सन्मानीत शिक्षकाची अतिशय प्रेरणादायी कथा पुस्तकाच्या स्वरूपात मांडली आहे. जळगाव येथील प्रशांत पब्लीकेशन या संस्थेतर्फे हे पुस्तक आज प्रकाशित करण्यात आले. यानिमित्त प्रशांत पब्लीकेशनमध्ये छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याला प्रमुख पाहुणे म्हणून वर्धिष्णू सोशल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सोसायटीच्या प्रणाली शिसोदिया, ओरिऑन इंग्रजी माध्यम सीबीएसई स्कूलचे प्राचार्य संदीप साठे, ए.टी. झांबरे महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रणिता झांबरे, प्रशांत पब्लीकेशनचे संचालक रंगराव पाटील आणि प्रदीप पाटील यांची उपस्थिती होती.

प्रारंभी मान्यवरांचे प्रशांत पब्लीकेशनतर्फे स्वागत करण्यात आले. चंद्रकांत भंडारी यांनी प्रास्ताविकातून पीटर ताबीची या पुस्तकाबाबत भूमिका मांडली. ते म्हणाले की, केनियातील पीटर ताबीची या उपक्रमशील शिक्षकाची ही कथा विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षणाविषयी आवड असणार्‍या सर्वांना भावणारी आहे. गरीब विद्यार्थ्यांच्या जीवनात नवीन अध्याय निर्मित करणारी ही कथा सर्वांना आवडेल असे प्रतिपादन त्यांनी केले. सर्व प्रमुख मान्यवरांनी आपापल्या संक्षिप्त मनोगतातून चंद्रकांत भंडारी यांच्या पुस्तकाच्या सृजनाबाबत त्यांचे कौतुक केले. हे पुस्तक सर्वांनी वाचण्याचे आवाहन देखील पाहुण्यांनी केले. चंद्रकांत भंडारी आणि सौ. भंडारी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

खालील व्हिडीओत पहा पुस्तक प्रकाशन सोहळा व पुस्तकाबाबत भंडारी यांनी दिलेली माहिती.

https://www.facebook.com/508992935887325/videos/432805284569511

Protected Content