गजानन क्षीरसागर यांना स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार

 

पाचोरा, प्रतिनिधी | रा.स्व.संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत यांच्यातर्फे दिला जाणारा स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार यावर्षी समाजसेवक गजानन क्षीरसागर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अनिल कुलकर्णी हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार संयोजक तुषार जवेकर, रमेशराव जोशी, अनिल कुलकर्णी, मनीष काबरा हे होते.

याप्रसंगी जनकल्याण समिती प्रांत संघटन मंत्री शरद खाडिलकर, विभाग कार्यवाहक राजू कुलकर्णी, निलेश खांडवेकर, उत्तमराव थोरात, अतुल जहागिरदार, पराग महाशब्दे, नंदू शुक्ल, सुमित पंडित, देविदास पंडित, सिद्धार्थ सोनवणे,मिराबाई पंडित उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर वाघ यांनी केले. गीत गायन उमेश जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन किरण कुलकर्णी यांनी केले. पसायदान गुणवंत क्षीरसागर यांनी गायले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सागर कोळी, चित्रीकरण अमोल गोंधळी, मंडप व्यवस्था राजू कोळी, संतोष कोळी, हेमंत गुरव, महिंद्रा घोंगडे, वैभव गिते, राहुल माळी, दिनेश पांडव, मयूर मासाळ, वैभव देविदास गीते, विनायक शिरसागर, सतीश चौधरी, राहुल चौथे, देवेंद्र माळी, देवेंद्र कोळी, शशिकांत गीते, गोपाल वाणी, योगेश वाणी, सिताराम वाणी, सचिन कुंभार, अमोल काळे, समाधान कोळी, रुपाली क्षीरसागर, वर्षा वाणी, मिरा वाणी, माणुसकी ग्रुप सदस्य, बजरंग दल सदस्य, स्वयंसेवक यांनी सहकार्य केले.

स्वामी विवेकानंद यांचे विचार युवकांनी आत्मसात करून समाजाचा व स्वतःचा विकास करावा.आपल्यात सेवाभाव उभा राहावा यासाठी प्रयत्न करणे. आपल्या धर्मातील कोणती व्यक्ती पीडित राहू नये त्यांचे दुःख दूर करण्यासाठी युवकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे,आजचे उत्सव मूर्ती गजानन क्षीरसागर त्यांच्यासारखे तरुण निर्माण व्हावेत हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे असे मत रमेशराव जोशी यांनी आपल्या भाषणात मांडले.

Protected Content