जळगाव प्रतिनिधी । शनीपेठ हद्दीत राहणाऱ्या शिक्षकाची २५ हजार रूपये किंमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना ७ जानेवारी रोजी मध्यरात्री घडली. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, प्रशांत यशवंत सोनवणे (वय ५०, रा. शनिपेठ) यांच्या मालकीची ही २५ हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच १९ बीएस १९०६) आहे. त्यांनी रात्री घराबाहेर दुचाकी उभी केल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. अमोल विसपुते करीत आहेत.