धानोर्‍यातून गावठी दारु विकी करणाऱ्या वृध्दावर कारवाई

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील धानोरा बुद्रूक येथे घराच्या शेजारी अवैध गावठी दारुची विक्री करणार्‍या वृध्दावर तालुका पोलीसांनी कारवाई केली असून त्याच्या ताब्यातील १५ लिटर गावठी दारून जप्त करण्यात आली. तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिक माहिती अशी की, धानोरा बुद्रूक येथे डिगंबर बुधा सोनवणे (वय-59) हा गावठी दारुची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरिक्षक रविकांत सोनवणे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल फेगडे, विलास पाटील, मनोज पाटील, सतिष हाळनोर, हरिलाल पाटील, विजय दुसाने यांच्या पथकाला कारवाईच्या सुचना केली. त्यानुसार पथकाने रविवारी सकाळी 12 वाजेच्या सुमारास कारवाई करुन डिगंबर सोनवणे यास ताब्यात घेतले व त्याच्याकडून 15 लीटर 750 रुपये किंमतीची गावठी दारु जप्त केली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल मनोज राजू पाटील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उमेश ठाकूर करीत आहेत.

Protected Content