Home राजकीय तृणमूलचे दोन खासदार भाजपच्या वाटेवर

तृणमूलचे दोन खासदार भाजपच्या वाटेवर

0
34

कोलकाता वृत्तसंस्था । नुकतेच तृणमूलला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झालेले सुवेंदू अधिकारी यांचे खासदार असणारे वडील व भाऊ हे लवकरच भाजपमध्ये दाखल होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

याबाबत वृत्त असे की, पश्‍चिम बंगालमधील मातब्बर नेते म्हणून ओळखले जाणारे सुवेंदू अधिकारी यांनी अलीकडेच तृणमूल काँग्रेसचा त्याग करून भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यानंतर सुवेंदू यांचे वडील आणि दोन भाऊ लवकरच भाजपामध्ये दाखल होणार आहेत. विशेष बाब म्हणझे हे दोन्ही तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत. यामुळे तृणमुलला यामुळे जोरदार हादरा बसणार असल्याचे राजकीय निरिक्षकांचे मत आहे.

काही दिवसांपूर्वी मिदनापूर जिल्ह्यात झालेल्या तृणमूल काँग्रेसच्या सभेला सुवेंदू यांचे वडील आणि तृणमूलचे खासदार शिशिर अधिकारी आणि भाऊ खासदार दिव्येंदू अधिकारी तसेच तृणमूलचे नेते असलेले धाकटे भाऊ सौमेंदू अधिकारी हे उपस्थित नव्हते. यामुळे आता त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेला जोर चढला आहे.


Protected Content

Play sound