भुसावळ रेल्वे विभागातील ८६ कर्मचारी सेवानिवृत्त

भुसावळ प्रतिनिधी । रेल्वेच्या प्रदिर्घ सेवेनंतर भुसावळ रेल्वे विभागातुन आज ३१ मे रोजी ८६ रेल्वे कर्मचारी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत कर्मचार्‍यंना रेल्वेतर्फे तत्काळ २४ कोटी रुपये ऑनलाइन त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. सेवानिवृत्ती संदर्भात रेल्वेद्वारा ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे समारंभाचे आयोजन न करता, सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचा यथोचित सन्मान ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रमाद्वारे तसेच त्यांच्या सेवेच्या कार्यालयात रेल्वे प्रतिनिधी म्हणुन बर्‍हानपुर, खंडवा, चाळीसगाव, भुसावळ, बडनेरा, मनमाड, अकोला आदी ठिकाणी कल्याण निरीक्षकांनी जाऊन पी.पी.ओ फोंल्डर दिलेत. तसेच मंडल रेल्वे प्रबंधक कार्यालयात सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना सहाय्यक कार्मिक अधिकारी बी. एस. रामटेके यांच्या हस्ते पी.पी.ओ फोंल्डर देण्यात आले. सहाय्यक कार्मिक अधिकारी विरेंद्र वडनेरे यांनी सूत्रसंचालन केले.सेवानिवृत्ती बद्दल कर्मचार्‍यांना विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोज कुमार सिन्हा, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.डी. गांगुर्डे यांनी सेवानिवृत्ती बद्दल संबोधित करुन पुढील भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. मंडल कार्मिक अधिकारी दिलीप खरात यांनी आभार मानले.

Protected Content