शाळा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी जे.के. पाटील यांची निवड

यावल प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभेत संघाच्या अध्यक्षपदी खिरवड येथील मुख्याध्यापक जे.के.पाटील यांची निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा ३० मे रोजी ऑनलाईन घेण्यात आली. सन२०२१ ते २०२३ या त्रैवार्षिक कालावधी साठी महामंडळाची कार्यकारिणी निवडण्यात आली. यात संघाच्या अध्यक्षपदी खिरवड येथील मुख्याध्यापक जे.के.पाटील यांची तर सचिव पदी शांताराम पोखरकर पुणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड तीन वर्षांकरीता करण्यात आली आहे.

बिनविरोध निवडीसाठी महामंडळाचे चार ही माजी अध्यक्ष सुभाष माने, अरूण थोरात, यु.डी. पाटील ऊचंदे व चिंतामणी तोरस्कर यांनी सहकार्य केले. मागील महिन्यातच जे. के.पाटील. यांची प्रभारी अध्यक्षपदी निवड झाली होती. जे. के.पाटील यांचे महामंडळासाठी व शिक्षकांसाठी व शिक्षण क्षेत्रातील योगदान बघता त्यांची निवड यथार्थ वाटते. जे. के. पाटील यांच्या निवडीने महामंडळाच्या अध्यक्षपदाचा मान जळगांव जिल्ह्याला तिसऱ्यांदा मिळत आहे. जिल्ह्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला ,जे. के.पाटील अप्पा नियुक्ती बद्दल अनेकांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Protected Content