गिरीष कुबेर यांच्या वादग्रस्त पुस्तकावर बंदी घाला; यावल येथे विविध संघटनेची मागणी

यावल प्रतिनिधी । पत्रकार गिरीष कुबेर लिखीत ‘रीनेइसन्स स्टेट’ या वादग्रस्त पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केले आहे. अशा पुस्तकावर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी शहरातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, स्वराज्य निर्माण सेनेच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोकसत्ताचे गिरीष कुबेर यांच्याव्दारे लिखित रीनेइसन्स स्टेट या ग्रंथात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल पृष्ठ क्रमांक ७६ वर टीका केली आहे. यामध्ये गिरीष कुबेर यांनी आपली अल्पमती पाजळतांना धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराजा विषयी जणु काही इतिहास संशोधक असल्याच्या थाटात जाणीवपुर्वक काही नवीन जावईशोध लावले आहे. यातुन कुबेरांचे इतिहासाचे अर्धवट ज्ञान दृष्टीस पडते आहे. धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराज आणि महाराणी सोयराबाई यांच्या बद्दल आक्षेपार्ह लिखाण केलेा आहे. अशा पुस्तकावर तत्काळ बंदी घालावी. अन्यथा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, स्वराज्य निर्माण सेनेच्यावतीने तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या निवेदनावर श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्तानचे यावल तालुका राहुल कोळी, मयूर महाजन, हर्षल येवले , अभिषेक चौधरी , चेतन भोईटे, हर्षल ठाकरे यांच्या स्वाक्षरी आहे .

Protected Content